प्रतिनिधी | अकोट
सिनेदृष्टी फिल्म प्रोडक्शनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या 'NMMS' या नव्या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच अकोट येथील विश्रामगृहात उत्साहात पार पडला. शुभारंभ मा. परागभाऊ पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गजानन डोमाले, योगेश वर्मा, पुरुषोत्तम टिचूकले, पुरुषोत्तम राठोड, गजानन राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता ८ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या NMMS (National Means-cum-Merit Scholarship) शिष्यवृत्ती परीक्षेच्या विषयावर आधारित हा लघुपट अकोट येथील शिक्षक रवींद्र आपोतिकर यांनी साकारला आहे. या चित्रपटाचे निर्माते, कथालेखक, पटकथाकार आणि संवादलेखक म्हणूनही त्यांनीच जबाबदारी सांभाळली आहे.
या लघुपटात वंशिका उभाड, जनार्धन राठोड, सीमा सपकाळ, जयप्रकाश तिजारे, रवींद्र वीरकर, प्रतिभा पवार, सचिन शेळके, नितीन ठाकरे, संजय उईके, बादल राठोड, सुरज सुधाकरराव पवार तसेच प्रा. डॉ. संजय हर्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन वंदेकर यांनी केले असून निर्मिती सहाय्य अल्का चिंचोळकर यांनी केले आहे. मेकअपची धुरा यश चिंचोळकर यांनी सांभाळली आहे.
यावेळी रवींद्र आपोतिकर यांनी सांगितले की, NMMS शिष्यवृत्ती परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शिक्षणाविषयीची जिद्द वाढवणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे हा या लघुपटाचा मुख्य उद्देश आहे. हा लघुपट प्रत्येक शाळेत दाखविला जावा, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, कवी, अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित तसेच 'सनातन सारथी न्यूज' यूट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार हे देखील या लघुपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून, लवकरच हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Post a Comment