जिल्हा परिषद शाळा शेलु (सें.) येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप तसेच दहावी व बारावीतील तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आयुक्त मा. पुरुषोत्तम गावंडे साहेब होते.यावेळी मातोश्री लीलाबाई गावंडे, ब्रजाताई राऊत, कल्पना गावंडे, प्रल्हादराव राऊत, ओजस गावंडे ,प्रभाताई पतंगे, दिगंबर गावंडे,अशोक मस्के, मधुकर पवार, सुभाष पवार, बाबूसिंग चव्हाण, राजूसिंग राठोड, पोलीस पाटील आडेताई हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र समन्वयक सुवर्णा लाड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच अनंतराव गावंडे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी गावंडे परिवार नेहमी अग्रेसर असते यासंदर्भात अनेक सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमात दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कु. सायली विनोदराव रणनवरे (96.40%), कु. देवी देविदास पवार (94.60%) आणि कु. श्रावणी किसन हुंबाड (94.60%) तसेच बारावी परीक्षेत यश मिळविणाऱ्या कु. रिज्जल इंदल चव्हाण (92.60%), कु. दीक्षा परमानंद बुटले (88.67%), कु. परी प्रशांत वानखडे (87.50%) आणि कु. जागृती संजय जयस्वाल (87.50%) या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, बक्षीस रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच पूजनीय दादा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शेलू येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या वतीने सुंदर अशा शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.याच कार्यक्रमात गावातील गरजू नागरिक दिगंबर लोंढे यांना आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण (फुलंब्री) यांच्या वतीने सस्नेह सदिच्छा भेट प्रदान करण्यात आली. हा सामाजिक उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास नेमाडे यांनी केले, तर सुनिता लव्हेकर यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राम पाटील गावंडे तसेच शाळेतील शिक्षक विनोद कांबळे, विजय मुजमुले आणि अर्चना गारचेलवार यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment