Top News

आधार' मराठी चित्रपटासाठी संभाजीनगरात २५ जुलै रोजी ऑडिशन; नवोदित कलाकारांना सुवर्णसंधी


संभाजीनगर | सनातन सारथी न्यूज नेटवर्क

वंदना गव्हाणे फिल्म प्रोडक्शनच्या आगामी 'आधार' या मराठी चित्रपटासाठी कलाकार निवड ऑडिशनचे आयोजन शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी हॉटेल रॉयल, संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. राज्यभरातील नवोदित कलाकारांना अभिनयाचे कौशल्य सादर करून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
ऑडिशनचा शुभारंभ आमदार विलास भाऊ भुमरे, राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड, पत्रकार, लेखक, कवी, अभिनेते व समाजसेवक सुरज सुधाकरराव पवार तसेच आयुब खान यांच्या हस्ते पूजन करून करण्यात येणार आहे. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, अनुभवी परीक्षकांमार्फत कलाकारांची निवड केली जाणार आहे.

तसेच लेखक व अभिनेते निंभा पुंडलिक कुंभार (एरंडोल, जि. जळगाव) यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

अभिनय क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वंदना गव्हाणे फिल्म प्रोडक्शनच्या वतीने करण्यात आले आहे. नवोदित कलाकारांसाठी ही ऑडिशन चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post