नांदेड | प्रतिनिधी
एल.के. हायर सेकंडरी इंग्लिश विद्यालय, महागाव (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी कु. सुष्मिता सुरज पवार हिने मित्तल ग्रुप व एलआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुद्ध्यांक चाचणी परीक्षेत महागाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल नवज्योत मानव विकास मंडळ व सेवादळ सेवा संघटना भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात कु. सुष्मिता पवार हिला 'प्रोत्साहन गुणरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी तथा पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षा मा. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मोहिनीताई नाईक यांनी सुष्मिता पवारचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार मा. अनुराधाताई अतुल चव्हाण यांनीही भ्रमणध्वनीद्वारे सुष्मिताचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु. सुष्मिता पवार ही सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, पत्रकार, अभिनेते, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तसेच सनातन सारथी न्यूज यूट्यूब चॅनेलचे राज्य प्रतिनिधी सुरज सुधाकरराव पवार यांची कन्या असून, सुप्रसिद्ध साहित्यिक स्वर्गीय सुधाकरराव परशुराम पवार (रा. सेलू, ता. आर्णी, जि. यवतमाळ) यांची नात आहे.
कु. सुष्मिता सुरज पवार हिने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post a Comment