Top News

चंद्रपूर : ब्रह्मपुरीतील डॉ. संजय हर्षे यांचा प्रेरणादायी प्रवास; साहित्य, शिक्षण व समाजकार्यात उल्लेखनीय कार्य

प्रतिनिधी - श्री सुरज पवार 
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्हपुरी तालुक्यातील माननीय डॉ. संजयजी हर्षे यांनी शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

डॉ. हर्षे हे केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित न राहता साहित्यिक म्हणूनही सक्रिय आहेत. विविध विषयांवर त्यांनी लेखन केले असून त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक उपक्रम राबवून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.

त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत त्यांना देश-विदेशातून शंभरहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ते एक प्रसिद्ध वास्तूविशारद म्हणूनही ओळखले जातात.

डॉ. संजय हर्षे यांचा हा प्रेरणादायी प्रवास आमचे प्रतिनिधी सूरज सुधाकरराव पवार यांनी जाणून घेतला असून त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन नव्या पिढीने शिक्षण, साहित्य आणि समाजकार्यात पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post