Top News

सेवा गुण रत्न पुरस्काराने पत्रकार, साहित्यिक सुरज सुधाकरराव पवार यांचा गौरव


नांदेड | प्रतिनिधी
सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, पत्रकार, अभिनेते आणि समाजसेवक सुरज सुधाकरराव पवार यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत 'सेवा गुण रत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार नवज्योत मानव विकास मंडळ आणि सेवा दल सेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणार आहे.

हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सुरज पवार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सुरज पवार यांनी 'वसंत गीतांजली' या काव्यसंग्रहाचे संपादन करून दिवंगत साहित्यिक सुधाकरराव पवार यांच्या लेखणीतून साकारलेल्या वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते.

या पुरस्कार सोहळ्यास माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण, आमदार तुषार राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, कार्यक्रमाचे आयोजन सुरेश राठोड आणि अर्जुन पवार यांनी केले आहे.

सुरज सुधाकरराव पवार यांना जाहीर झालेल्या 'सेवा गुण रत्न पुरस्कार बद्दल साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

— प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार
सनातन सारथी न्यूज | महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post