धरणगाव | प्रतिनिधी
खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून गाडी क्र. 09025/09026 वलसाड–दानापूर स्पेशल एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सेवा दि. 1 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे धरणगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा तसेच परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गाडी क्र. 09025 वलसाड–दानापूर स्पेशल एक्सप्रेस दर सोमवारी धावते. ही गाडी धरणगाव रेल्वे स्थानकावर दुपारी 1.40 वाजता थांबते. या गाडीमुळे भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, प्रयागराज, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन तसेच दानापूर या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत प्रवास सुलभ झाला आहे.
तर गाडी क्र. 09026 दानापूर–वलसाड स्पेशल एक्सप्रेस दर बुधवारी धावते. ही गाडी धरणगाव येथे दुपारी 4.30 वाजता थांबते आणि पुढे नंदुरबार, बेस्तान मार्गे वलसाडकडे रवाना होते.
या विशेष रेल्वे सेवेचा धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा तसेच परिसरातील प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार स्मिता वाघ, ZRUCC सदस्य प्रतीक जैन (पश्चिम रेल्वे, मुंबई) तसेच खान्देशातील विविध प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
या रेल्वे सेवेची मुदतवाढ झाल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त करत खासदार स्मिता वाघ यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment