Top News

महागाव तालुक्यातून सुष्मिता सुरज पवार प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण


महागाव प्रतिनिधी :
मुक्काम पोस्ट सेलू (से), ता. आर्णी, जि. यवतमाळ येथील कु. सुष्मिता सुरज पवार हिने मित्तल ग्रुप ऑफ एलआयसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बुद्ध्यांक चाचणी परीक्षेत महागाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सुष्मिता ही एल.के. इंग्लिश हायर सेकंडरी विद्यामंदिर, महागाव येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दि. १२ जुलै २०२६ रोजी शेकूराज मंगलम, फुलसावंगी रोड, महागाव येथे मानपत्र प्रदान करून तिचा सत्कार करण्यात आला.

या यशाचे श्रेय सुष्मिताने आपल्या आई-वडिलांसह शाळेतील शिक्षक व वर्गशिक्षकांना दिले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

— प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार, सनातन सारथी न्यूज

Post a Comment

Previous Post Next Post