प्रतिनिधी | श्री सुरज पवार (पुसद जि. यवतमाळ)
हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुसद परिसरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत मानवतावादी उपक्रम राबवून जयंती उत्साहात साजरी केली.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, सेवादासनगर येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि वृक्षारोपणाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, पुसद यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग व लेखनसाहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वसुंधरा बहुउद्देशीय संस्था आणि मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा परिसरात वटवृक्षाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंकजपाल महाराज, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव, पंजाब ढेकळे, अनंता चतुर, मधुकर चव्हाण, धनंजय आघाम, अरुण नागुलकर, सोनू पाटील, मंगेश भगत, दिगंबर देशमुख, वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचे नितीन रमेश चव्हाण, मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्थेचे पवन बोजेवार, अमित हटवार, पुस सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयसिंग राठोड, दादाराव पाईकराव, संजय ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड, ग्रामपंचायत सदस्य सुनील राठोड, रामेश्वर पवार, सुहास जाधव, चंदन पवार, गणेश राठोड, विकास जाधव, आदित्य राठोड, अनुबाई राठोड, मुख्याध्यापिका जयश्री पवार, शिक्षिका प्रीती राठोड तसेच पार्डी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतीदिनाबाबतही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. स्व. सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन १० मे रोजी न साजरा करता त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे २१ ऑगस्ट रोजी शासनस्तरावर साजरा करण्याबाबत आवश्यक आदेश जारी करण्यात यावेत, अशी मागणी आमदार इंद्रनील नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Post a Comment