Top News

स्वराज्य फिल्म प्रोडक्शनचे दिग्दर्शक-निर्माते गिरीश राजूरकर यांची दादासाहेब फाळके युनियन पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी निवड


प्रतिनिधी | सनातन सारथी न्यूज
स्वराज्य फिल्म प्रोडक्शनचे दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माता गिरीश राजूरकर यांची दादासाहेब फाळके युनियन, पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे चित्रपट क्षेत्रासह कलाविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गिरीश राजूरकर गेल्या सात वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रातील अनेक नवोदित कलाकारांना संधी देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनाथ आणि गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत.

अनेक अडचणींवर मात करत त्यांनी स्वराज्य फिल्म प्रोडक्शनची स्थापना केली आणि सातत्याने दर्जेदार कलाकृतींची निर्मिती सुरू ठेवली. त्यांच्या या कार्याची दखल घेत दादासाहेब फाळके युनियन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी त्यांची पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी नियुक्ती केली.

गिरीश राजूरकर यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सनातन सारथी न्यूजकडूनही त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
ही माहिती स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना, यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा अभिनेते सुरज सुधाकरराव पवार यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post