दिगरस | प्रतिनिधी – सुरज सुधाकरराव पवार
राज्याचे जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दिगरस तालुक्यातील चिंचपात्र येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन सुभाष रमेश राठोड, अध्यक्ष, संत रामजी बाबा फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
शिबिरात नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. यावेळी रमेश नाईक, रायसिंग राठोड, विशाल आडे, राजूश चव्हाण तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश उडाखे आणि गावातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
या नेत्रतपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी लाभ घेतला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
– प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार, सनातन सारथी न्यूज यूट्यूब चॅनेल
Post a Comment