Top News

सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, अभिनेते, पत्रकार व समाजसेवक सुरज सुधाकरराव पवार यांचा 'सेवा गुणरत्न' पुरस्काराने गौरव



नांदेड प्रतिनिधी :

सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, अभिनेते, पत्रकार व समाजसेवक तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी सुरज सुधाकरराव पवार यांचा 'सेवा गुणरत्न' पुरस्कार देऊन माननीय मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा गौरव प्रदान करण्यात आला.

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित दिवंगत साहित्यिक, कवी, पत्रकार व समाजसेवक सुधाकरराव परशराम पवार (रा. शेलू, ता. आर्णी, जि. यवतमाळ) लिखित 'वसंत गीतांजली' या काव्यसंग्रहाचे संपादन सुरज सुधाकरराव पवार यांनी केले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथे संपन्न झाले.

वसंतराव नाईक यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणादायी वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने 'वसंत गीतांजली'ची निर्मिती करून सुरज पवार यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या साहित्यिक व सामाजिक कार्याची दखल घेत मोहिनीताई इंद्रनील नाईक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी खासदार व्यंकटेश कापडे, सेवा दळ संघटनेचे अध्यक्ष सुरेश राठोड, 'वीर शिरोमणी' चे संपादक ठाकूर सर, 'नंदगिरीचा कानोसा' चे संपादक मारुती शिकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post