Top News

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती शिवाजी विद्यालय, यवतमाळ येथे उत्साहात साजरी


प्रतिनिधी : यवतमाळ जिल्हा
सुरज सुधाकरराव पवार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ येथील शिवाजी विद्यालयात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी विकासासाठी दिलेले योगदान, शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना तसेच हरित क्रांतीत बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यावर उपस्थितांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती सहाय्यक शिक्षक रोहित अनंत निलावार यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post