Top News

स्व. जयश्री संजयराव हर्षे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजूंना रेनकोट वाटप.


प्रतिनिधी : ब्रह्मपुरी

स्वर्गीय सौ. जयश्री संजयराव हर्षे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानव कुटी जीवन संशोधन केंद्र, ब्रह्मपुरी यांच्या वतीने गरजू नागरिकांना रेनकोट वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अतुल देशकर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष योगेश मिसर तसेच सुप्रसिद्ध लेखक, कवी, पत्रकार, अभिनेते आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुरज सुधाकरराव पवार उपस्थित होते.
स्व. जयश्री संजयराव हर्षे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ

मानव कुटी जीवन संशोधन केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजयराव सुशीला प्रभाकरराव हर्षे यांच्या हस्ते गरजू नागरिकांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात गरजू नागरिकांना संरक्षण मिळावे या सामाजिक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभावी कार्यातून समाजात सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश दिला जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मानव कुटी जीवन संशोधन केंद्राचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post