Top News

महागाव बसस्थानकात एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात.


प्रतिनिधी : श्री सुरज सुधाकरराव पवार 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त महागाव बसस्थानक परिसरात मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बस नियंत्रक श्री. बापूजी पारवेकर होते. यावेळी जगदीश महाराज पिंपरीकर, राहुल गावंडे, मधुकर सदाशिव पाटील, भांब भगवान मोरे, माधव आगोसे, ज्ञानोबा नावाडे, शामराव कदम यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच आगार प्रमुख अमृत कचवे व प्रबोधिनी किनाके (उमरखेड आगार) यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी जगदीश महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती" या अभंगाचा दाखला देत वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विषद केले. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमात AWS योगेश देशमुख, एसटीचे अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post