Top News

अनाथ विद्यार्थिनीला जयहर्ष फाऊंडेशनकडून ₹५ हजारांची आर्थिक मदत


प्रतिनिधी | लक्ष्मण बाविस्कर (महाजन) 

जयहर्ष सार्वजनिक सेवा फाऊंडेशन, धरणगाव यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कै. बी. जे. महाजन विद्यालय, अनोरे येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी अनाथ विद्यार्थिनी कु. योगिता संजय माळी हिला ₹५ हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

कु. योगिताच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने तिच्या शिक्षणाला हातभार लागावा आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी या उद्देशाने संस्थेने ही आर्थिक मदत केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत दगडू माळी, उपाध्यक्ष राकेश कैलास चौधरी, सचिव हरी तुकाराम महाजन तसेच सदस्य संतोष दगा चौधरी, विजय किरण महाजन, बीरजेस सिंग चव्हाण आणि मनोज चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाला कै. बी. जे. महाजन विद्यालयाचे उपाध्यक्ष मधुकर नामदेव देशमुख, मुख्याध्यापक आर. बी. महाले, ए. ए. पाटील, के. आर. महाजन, एस. एम. महाजन, के. ए. वारुळे, ए. के. पाटील, डी. बी. महाजन, किरण भटू महाजन, दिलीप भगवान चव्हाण, प्रकाश नामदेव देशमुख, धानोरे येथील संजय माळी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी जयहर्ष सार्वजनिक सेवा फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post