धरणगाव, अमळनेरसह खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा
धरणगाव | प्रतिनिधी : धरणगाव, अमळनेर व परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून गाडी क्र. 04156/04155 उधना–सुभेदारगंज स्पेशल एक्सप्रेसची सेवा 1 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. या विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गाडी क्र. 04156 उधना–सुभेदारगंज स्पेशल एक्सप्रेस दर शुक्रवारी धावते. ही गाडी अमळनेर येथे रात्री 8.00 वाजता तर धरणगाव येथे रात्री 8.25 वाजता थांबते. या गाडीद्वारे प्रवाशांना भुसावळ, इटारसी, राणी कमलापती तसेच पुढील मार्गावरील स्थानकांपर्यंत सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
तर गाडी क्र. 04155 सुभेदारगंज–उधना स्पेशल एक्सप्रेस दर मंगळवारी उधनाकडे धावते. ही गाडी धरणगाव येथे सकाळी 8.53 वाजता आणि अमळनेर येथे सकाळी 9.15 वाजता थांबते.
या विशेष रेल्वे सेवेचा धरणगाव, अमळनेर तसेच खान्देशातील प्रवाशांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन खान्देशच्या खासदार स्मिताताई वाघ, ZRUCC सदस्य प्रतीक जैन तसेच खान्देशातील विविध प्रवासी संघटनांनी केले आहे.
Post a Comment