प्रतिनिधी | महागाव (जि. यवतमाळ)
हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ जुलै २०२६) महागाव येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास तांड्याचे नायक हिरासिंग मानसिंग चव्हाण, डॉ. पंजाबराव राठोड, भारतीय जनता पार्टीचे महागाव तालुकाध्यक्ष दीपक आडे, जगदीश महाराज पिंपरी, कारभारी बाबूलाल राठोड, रामराव नरवाडे, राजू राठोड, देवा राठोड, डॉ. भेंडे, वानोळे सर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. बी. एन. चव्हाण, बाबुलाल चव्हाण, सचिन सगने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जगदीश महाराज यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. त्यांनी १९७२ च्या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न, महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत दिलेले योगदान, "पाणी अडवा, पाणी जिरवा" या जलसंधारणाच्या संकल्पनेचा प्रसार, शेतकऱ्यांसाठी विविध पतसंस्थांची उभारणी तसेच "माझा शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे" या दूरदृष्टीपूर्ण विचारांचा विशेष उल्लेख केला.
या कार्यक्रमास सनातन सारथी न्यूजचे यूट्यूब चॅनेल प्रतिनिधी स्वप्निल चव्हाण तसेच सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार सुरज सुधाकरराव पवार यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते.
Post a Comment