प्रतिनिधी | यवतमाळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार सौ. अनुराधाताई अतुलराव चव्हाण यांच्या राजकीय, सामाजिक व लोकहिताच्या कार्यावर आधारित पुस्तक सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, कवी व अभिनेते सुरज सुधाकरराव पवार यांच्या लेखणीतून लवकरच प्रकाशित होणार आहे.
याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या 'वसंत गीतांजली' या काव्यसंग्रहाचे संपादक असलेले सुरज सुधाकरराव पवार हे विविध सामाजिक, राजकीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर लेखन करत असून, आता आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करत आहेत.
या पुस्तकात त्यांच्या सामाजिक बांधिलकी, विकासकामे, महिला सक्षमीकरणासाठीचे योगदान, जनसंपर्क आणि राजकीय प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
🟦 शुभेच्छा
या उपक्रमाबद्दल सनातन सारथी न्यूजचे संपादक किरण माळी यांनी लेखक सुरज सुधाकरराव पवार यांचे अभिनंदन करून पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. "आमदार अनुराधाताई अतुलराव चव्हाण यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा प्रवास या पुस्तकातून समाजापुढे प्रभावीपणे मांडला जाईल. हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Post a Comment