Top News

महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुप्रसिद्ध लेखक-पत्रकार सुरज पवार यांचा सत्कार

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, अभिनेते, कवी तथा संपादक सुरज सुधाकरराव पवार यांचा त्यांच्या साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'वसंत गीतांजली' या काव्यसंग्रहाचे संपादन सुरज पवार यांनी केले आहे. साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

या सत्कारप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, मंत्री अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते तसेच सुप्रसिद्ध लेखक निंबा कुंभार यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सुरज सुधाकरराव पवार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील साहित्यिक, पत्रकारितेच्या व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post