Top News

बंजारा ब्रिगेड भारततर्फे राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक 21 जून रोजी बीड येथे


मुंबई प्रतिनिधी :

बंजारा ब्रिगेड भारततर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक रविवार, दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात येणार असून आरक्षणाचा मुद्दा, शिक्षण, राजकारण तसेच सामाजिक विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

या बैठकीस बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रविकांत भाऊ राठोड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई सुरज पवार तसेच जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुरज सुधाकर पवार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post