पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छाने स्वागत; विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप
साळवे (प्रतिनिधी) : साळवे येथील अमृत महोत्सवी शाळा साळवे इंग्रजी विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी *नव्याने प्रवेश घेतलेल्या* विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले, तर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे होते. प्रारंभी व्ही. के. मोरे यांनी प्रास्ताविक करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
शाळेच्या परंपरेनुसार पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुळाची जिलेबी व पुलावचा स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी व संस्मरणीय ठरला.
मुख्याध्यापक एस. डी. मोरे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित अभ्यास व शिस्तीचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, ज्येष्ठ शिक्षिका नीता पाटील, रंजना नेहेते, गुणवंती पाटील, पौर्णिमा वारके, वर्षा नेहेते, ज्येष्ठ शिक्षक श्री ए वाय शिंगणे, बी. आर. बोरोले, एस. व्ही. राठोड, एस. पी. तायडे, व्ही. एस. कायंदे, तसेच पूज्य साने गुरुजी सेमी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका जयश्री कोल्हे व कांचन अत्तरदे आदी उपस्थित होते.
Post a Comment