Top News

🟦 कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तक लवकरच...

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असून हे पुस्तक सुप्रसिद्ध लेखक, कवी व पत्रकार सुरज सुधाकरराव पवार लिहिणार आहेत.

सदर पुस्तक लेखनाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुरज सुधाकरराव पवार यांनी यापूर्वी ‘हरित क्रांतीचे प्रणेते’ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘वसंत गीतांजली’ या कविता संग्रहाचे संपादन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री सुनिता ताई अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले होते.
पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुरज पवार हे सनातन सारथी न्यूज यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी असून त्यांच्या कार्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सेलू येथील रहिवासी असलेले पवार सध्या विविध सामाजिक, साहित्यिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत.

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक कार्याचा आढावा या पुस्तकातून घेण्यात येणार असून त्यांच्या जीवनप्रवासाचे सविस्तर चित्रण या माध्यमातून वाचकांसमोर येणार आहे, अशी माहिती स्वतः लेखक सुरज सुधाकरराव पवार यांनी दिली आहे.

🟦 प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार
सनातन सारथी न्यूज, यवतमाळ

Post a Comment

Previous Post Next Post