Top News

शिवसंवाद मेळाव्यासाठी अँड.संगिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाटोदा इथे महिला आघाडीची तयारी

पाटोदा ( प्रतिनिधी ): खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीड इथे होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख अँड. संगिता चव्हाण यांनी पाटोदा इथे महिला आघाडी च्या तयारीचा आढावा घेतला.

शिवसेना मुख्यानेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने मराठवाड्यासह महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीची मोठी जबाबदारी खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे. मराठवाडा दौऱ्याच्या अंतर्गत दि.२९ रोजी बीड येथे होणाऱ्या बैठकीला शिवसेना महिला आघाडीची उपस्थिती जास्तीत जास्त असायला हवी या करिता पाटोदा इथे महिला आघाडीची बैठक शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख अँड. संगिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

पाटोदा इथे होणाऱ्या शिवसंवाद मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर महिलांचे शिवसेना पक्षात प्रवेश करून गाव, तांडा, शहर पातळीवर महिलां संघटना मजबूत करण्याचा मानस या वेळी अँड. संगिता चव्हाण यांनी व्यक्त केला. मुख्यानेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह मा.खा.श्रीकांतजी शिंदे साहेब आणि पक्षचे सर्व नेते यांच्यासह पक्षच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या संघटित प्रयत्नातून पक्ष संघटना मजबूत होईल. शेवटच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न हे पक्षसाठी मजबुतीकरणचा कणा असतो व कार्यकर्त्यांचे हात बळकट करण्यावर मा.शिंदेसाहेबांचा भर असतो असे शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख अँड. संगिता चव्हाण यांनी व्यक्त केले. या वेळी फरजना शेख, प्रतिभा वणवे, उपजिल्हाप्रमुख, मनीषा शरणागत तालुकाप्रमुख, प्रतिभा देशमुख यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post