प्रतिनिधी पाचोरा: जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरातील तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे याच्या लॉजमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्रचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
मात्र, आता या प्रकरणात रवींद्रसोबत त्याच्या अल्पवयीन प्रेयसीनेही लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि प्रेयसी विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवरील एका लॉजमध्ये प्रेमीयुगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत रवींद्र मोरे (वय २५, रा. गिरड, ता. भडगाव) याचा मृत्यू झाला, तर त्याची अल्पवयीन प्रेयसी दोरीचा फास तुटल्याने बचावली. दरम्यान, रवींद्र मोरे याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता.
या प्रकरणात संबंधित लॉज चालकांवर कारवाईची मागणी करत संतप्त नातेवाइकांनी पाचोरा शहरात तीव्र आंदोलन छेडलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यानंतर आंदोलकांचा मोर्चा थेट पाचोरा पोलिस ठाण्यावर धडकला. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स हटवत आंदोलकांनी पोलीस ठाण्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे, जळगाव येथे शवविच्छेदन करून आणलेला रवींद्रचा मृतदेहही आंदोलकांनी पोलीस ठाण्यात आणल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं होतं.
या प्रकरणात नातेवाइकांनी गुन्हा दाखल करण्यास आणि पंचनामा प्रक्रियेस विलंब का झाला? असा सवाल उपस्थित केला. अखेर पोलिसांनी संबंधित लॉजचा मालक सूरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांना अटक केल्याची माहिती आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान, रवींद्र मोरे याचा महिन्याभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. त्यामुळे दोघांनी गळफास का घेतला? रवींद्रच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय?, या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील तपासाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, संबंधित मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बाल सुधारगृहात रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?

Post a Comment