Top News

स्वामी समर्थ नगर येथून मोटरसायकलची चोरी, CCTV मध्ये चोर कैद

धरणगाव | स्वामी समर्थ नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल चोरीची घटना घडली. आर. डी. महाजन सर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये लावलेली टीव्हीएस कंपनीची रायडर (वाहन क्रमांक MH 19 DW 8529) ही मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. सदर मोटरसायकल रोशन वाघ यांच्या मालकीची आहे.

ही चोरी रात्री 12:54 वाजता घडली असून, चोरट्याचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने रात्री 12:58 वाजता लॉक तोडून मोटरसायकल उचलली व कंपाऊंड मधून पळ काढला.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोणाला सदर मोटरसायकल कुठेही आढळल्यास कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 7507941394

Post a Comment

Previous Post Next Post