चांदसर येथून दरवर्षी शेकडो भाविक पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडी काढतात. यावर्षीही या पायी यात्रेची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि पायी दिंडीचे संयोजक, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या शुभहस्ते, त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने झाली.
ही दिंडी मागील १९ वर्षांपासून अखंडित परंपरेने सुरू आहे. धरणगाव येथे या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात या सर्व दिंडीतील वारकऱ्यांसाठी स्वागत व अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. या सेवेसाठी इंदिरा गांधी विद्यालयाचे चेअरमन, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील आणि त्यांचे सुपुत्र डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.
या स्वागत कार्यक्रमास धरणगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये
मराठा प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. डी. बी. पाटील
सचिव प्रा. डी. आर. पाटील
उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन
ज्येष्ठ नेते रतिलाल नाना चौधरी
अॅड. वसंतराव भोलाने
राजेंद्र पाटील
दीपक जाधव
जनकल्याण पतसंस्थेचे मॅनेजर चौधरी साहेब
ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, गोपाल पाटील
संपादक भरत भाऊ चौधरी
कल्पेश महाजन
भीमराव पाटील
यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या यात्रेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
या दिंडीचा ध्वजारोहण सोहळा, नित्य हरिपाठ, भजन-कीर्तन आणि भक्तिमय वातावरण हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. धरणगाव शहरात या परंपरेचे जतन करणाऱ्या सर्व संयोजकांचे आणि सहभागी मान्यवरांचे विशेष कौतुक होत आहे.
Post a Comment