जळगाव (दि. 10 जून 2025) - जळगाव शहरातील महावितरणच्या कंत्राटी वायरमनला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
प्रकरणाचे सविस्तर वृत्त :
तक्रारदार (वय 46, रा. जळगाव) यांच्या घराचे वीज मीटर हे आधीच्या मालकाच्या नावे होते. काही दिवसांपूर्वी महावितरणचे कंत्राटी वायरमन भूषण शालिग्राम चौधरी (वय 37, प्रभात कॉलनी कक्ष, जळगाव) हे वीज मीटर बदलण्यासाठी तक्रारदार यांच्या घरी आले. त्यावेळी चौधरी यांनी तक्रारदारांना सांगितले की, मीटरचे सील तुटले असून त्यांनी छेडछाड केल्याचा आळ लावला. तसेच, वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत, मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ओके करण्यासाठी व गुन्हा न दाखल करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने लगेच याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दिली. विभागाने तक्रारीची पडताळणी करताना 10 जून रोजी आरोपीने पंचासमक्ष 5 हजार रुपये लाच मागितली व स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, सापळा रचून आरोपी भूषण चौधरी याला पंचासमक्ष 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगाव
सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे
सापळा पथक: सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. सुनील वानखेडे, पोकाॅ. अमोल सूर्यवंशी
मार्गदर्शक: मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र
सर्व नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे प्रतिनिधी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव येथे संपर्क साधावा.
📞 दुरध्वनी: 0257-2235477
📱 मोबाईल: 9702433131
☎️ टोल फ्री: 1064
अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव – भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेच्या सेवेत सदैव तत्पर.
Post a Comment