धरणगाव प्रतिनिधी.
आध्यात्मिक विद्यापीठाचे कुलगुरु प. पू. गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आणि आ. गुरुपुत्र नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ बालसंस्कार आणि आध्यात्मिक सेवा विकास केंद्र धरणगावं तालुक्यातील पिंप्री खु. देवाची येथिल साप्ताहिक सेवा केंद्रात 8 जून रविवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेच्या कालावधीत एक दिवसीय उन्हाळी बालसंस्कार मूल्य शिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हयांचे अप्पर आयुक्त श्री विशाल मकवाने साहेब व जेष्ठ सेवेकरी श्री. पी. सी. पाटील साहेब, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हि वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी आणि स्वामी समर्थ महाराजांची पालखी सोहळ्याने झाली. गावात मिरवणूक काढण्यात आली.धरणगावं तालुक्यातील सर्व साप्ताहिक सेवा केंद्राचे सेवेकरी आणि बालसंस्कार विभागातील सर्व संस्कारी मुलं- मुली मोठया संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांचा हातून दिप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरु झाला. नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्कार काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले, त्यांनी संस्काराचे महत्व सर्व विद्यार्थी यांना बोध कथेच्या माध्यमातून पटवून दिले. सर्वाना भविष्यात काय करायचे आहे यावर खूप सुंदर मार्गदर्शन केले.
नंतर आदरणीय श्री पी. सी. आबासाहेब पाटील यांनी संस्कार आणि शालेय जीवन या विषयी मुलांना मार्गदर्शन करून जीवन जगण्याचा सुंदर मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे असे सांगून मुलांना आध्यत्माची गुरु विषयी निष्ठा किती महत्वाची आहे हे थोडक्यात सांगून आपले स्वामी विषयी अनुभव सांगितले.
मधान्य सुट्टीत मुलांनी सुरुची भोजनाचा लाभ घेतला.. नंतर विविध स्पर्धेत मुलांनी भाग घेऊन विशेष प्रविण्य मिळविले. सांस्कृतिक कार्यक्रम झालेत, मुलं.. मुली यांनी विविध योगा.. शारीरिक कोशल्य दाखवून सर्व ग्रामस्थ मंडळीना मंत्र मुग्ध केले.
पिंप्री खु. देवाची येथील व आजू बाजूचा सर्व धरणगावं तालुक्यातील सर्व सेवेकारी यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला..
विशेष पिंप्री गावातील सर्व सेवेकरी पुरुष व महिला यांनी खुप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
शिबिरात सेवेकरांच्या १०वी १२वी च्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment