आज दि. 09 जून, 2025 सोमवार रोजी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष आज दि 09 जून पासून सुरू झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात, फुलांचा वर्षाव आणि औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदी दिसत होते. शिक्षकांनी स्वागत गीत गाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी यांनी सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेचे कार्यकारी संचालक जी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, प्रामाणिकपणा अंगात बाणावा या विषयी अनमोल मार्गदर्शन केले. शाळेचे प्राचार्य विवेक रूपनर यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नंतर अध्यक्षांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिस्कीट व चॉकलेट देण्यात आले.
लेझीम, ढोल ताशे यांच्या गजरात इम्पिरियलच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी भव्य स्वागत.
Sanatan Sarthi News
0
Post a Comment