Top News

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्याकडून पाहणी; त्वरित पंचनाम्याच्या सूचना.



एरंडोल, ता. १३ जून - शिवसेना उपनेते मा. गुलाबरावजी वाघ साहेब यांनी हिंगोणे, जवखडे बु., जवखेडा बु., भोद खुर्द तसेच एरंडोल परिसरातील वादळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर वाघ साहेब यांनी तात्काळ प्रांत अधिकारी गायकवाड साहेब तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता, एरंडोल व धरणगाव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली.

या पाहणी दौऱ्यात संजय पाटील, प्रकाश महाजन, कैलास महाजन, रामदास पाटील, विलास माळी, विजय पाटील, आधार धनगर, विजय भीमसिंह पाटील, सुरेश भाऊ सिंग पाटील, विलास पवार, शरद शिरसाठ आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

गुलाबराव वाघ साहेब यांनी शेतकऱ्यांना धीर देत शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला व शासनदरबारी या बाबत ठोस पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

Post a Comment

Previous Post Next Post