Top News

मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिरात कांताई हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा डोळ्यांच्या उपचारासाठी पेशंट रवाना.

धरणगाव, दि. १३ जून – मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लहान माळीवाडा, धरणगाव येथील १७ रुग्णांना दुसऱ्यांदा डोळ्यांच्या उपचारासाठी कांताई हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. या उपक्रमासाठी महायुतीचे शिवसेना व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष सहकार्य केले.

या उपक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत आहे.

या आरोग्य शिबिरामुळे डोळ्यांचे विविध आजार असणाऱ्या रुग्णांना उपचाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्था, तपासणी आणि रुग्णालयातील देखरेखीची विशेष जबाबदारी पार पाडली.

या उपक्रमामुळे लहान माळीवाडा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांनी यासाठी सरकार आणि पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post