Top News

धरणगाव तालुका आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक संघटनेच्या अध्यक्षपदी रविंद्र कंखरे यांची निवड.

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक संघटनेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन आज धरणगाव तहसील कार्यालयात करण्यात आले. या बैठकीत तालुक्यातील ९० पेक्षा अधिक सेतू चालक उपस्थित होते. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत धरणगाव तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालक संघटनेच्या अध्यक्षपदी रविंद्र कंखरे यांची निवड करण्यात आली. यावेळी नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुक्यातील विविध गावांतील सेतू चालकांनी आपापले विचार मांडले. तसेच तालुक्यातील नागरिकांना सेवा केंद्राच्या माध्यमातून अधिक वेगाने, पारदर्शक सेवा मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीत फार्मर आयडी, संजय गांधी निराधार योजना, विधवा पगार योजना अर्ज प्रक्रिया, रेशन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे अशा अनेक शासकीय योजनांवरील अडचणींवर चर्चासत्र झाले. या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीत चेतन जाधव, प्रशांत बच्छाव, सुबोध खैरनार, बंटी महाजन, चेतन देशमुख, निलेश पाटील, ज्योती भाटिया, ईश्वर फुलपगार, सुशील महाजन, योगेश पाटील, अनिल बडगुजर, भूषण बाविस्कर, दिगंबर सोनवणे, सागर दुगे, गाजी शेख, जावेद खान, किशोर कोळी, पंकज वाणी, प्रशांत महाजन, स्वप्निल भाटिया, समीर शेख, उज्वल देवरे, विशाल भाटिया, वीरेंद्र निकुंभ, सचिन सोनवणे, रवींद्र मोरे, राजेश महाजन, प्रदीप पाटील, कुणाल गोसावी, गोविंदा पाटील, गणेश पाटील व तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक तसेच सीएससी सेंटर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठक यशस्वी करण्यासाठी सर्व सेतू चालकांनी सहकार्य केले. नव्याने निवड झालेल्या अध्यक्षांसह कार्यकारिणीने सर्वांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा विश्वास व्यक्त केला.


Post a Comment

Previous Post Next Post