Top News

पश्चिम रेल्वे चा अमळनेर स्टेशन रेल्वे सुरक्षा बल RPF अधिकारी यांच्या कार्यतत्परतेला सलाम..

एका प्रवाशाचे रोख ₹20,000/-, सॅमसंग टॅब ₹15,000/- आणि इतर सामानासह एकूण ₹40,000/- किंमतीचा मुद्दे माल कार्यतत्परतेने केला प्रवाशास सुपूर्त..

"प्रवाशी" व "खान्देश प्रवासी असोसिएशन",धरणगाव यांनी अमळनेरच्या RPF अधिकारी व सर्व टीम यांचा कार्यपद्धतीचे केले कौतुक व व्यक्त केले आभार

 सविस्तर वृत्त दि. 08.05.2025 रोजी गाडी क्र. 22973 अमळनेर स्थानक, प्लॅटफॉर्म क्र. 02 वर रात्री 03:08 वाजता आगमनाच्या वेळी, अमळनेर येथील *रेल्वे सुरक्षा बल,RPF उपनिरीक्षक श्री.खेल सिंग मीना* यांच्याद्वारे रात्रीच्या गस्तीदरम्यान हे निदर्शनास आले की, दोन प्रवासी - श्री संतोष कुमार व श्री सौरव कुमार, रा. गाव जमालदीपूर, पोस्ट गौरीपूर, तालुका नवगछिया, पोलीस स्टेशन बिहपूर, जिल्हा भागलपूर (बिहार), मो. 6200868928 हे धावत्या गाडीमधून S/2 कोचमधून उतरले.

RPF उपनिरीक्षकाने चौकशी केली असता प्रवाशांनी सांगितले की ते भचाऊकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु चुकून त्यांनी गाडी क्र. 22973 पकडली व वडोदऱ्याहून अमळनेर येथे पोहचले. त्यांच्याकडे तिकीट क्र. G93119237 होता. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडीतून उतरायचा प्रयत्न केला. त्यांना वाटले की त्यांचा बॅग गाडीत राहिला आहे, म्हणून त्यांनी S/2 कोचमधील एका प्रवाशास बॅग खाली फेकून देण्याची विनंती केली. दुर्दैवाने, त्या प्रवाशाने दुसऱ्याच प्रवाशाची बॅग खाली फेकली.

नंतर सदर बॅग व दोन्ही प्रवाशांना RPF पोस्ट, अमळनेर येथे आणण्यात आले. त्यानंतर जळगाव सील तपासणीस रात्रपाळीत नियुक्त कॉन्स्टेबल अजय कुमार पाल यांना बॅगचा फोटो पाठवून गाडी क्र. 22973 च्या S/2 कोचमधील प्रवाशांकडून बॅगची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले. गाडी जळगाव स्थानकावर पोहचल्यावर कॉन्स्टेबल अजय पाल यांनी प्रवाशांकडून विचारणा केली. एक प्रवासी-श्री सूर्य नारायण, वय 41 वर्ष, वडिलांचे नाव श्री लक्ष्मण मूर्ती, रा. दुनावेडी, बारूआ, सोमपेठा मंडलम, श्रीकाकुलम (आंध्रप्रदेश), मो 9106744669 यांनी बॅग ओळखली आणि सांगितले की ते गांधीधामहून ब्रह्मपूरपर्यंत तिकीट क्रमांक E-89067718 द्वारे प्रवास करत आहेत व अमळनेर येथे बॅग घेण्यासाठी येणार आहेत.

 दि. 11.05.2025 रोजी सदर प्रवासी गाडी क्रमांक 22974 ने अमळनेर पोस्ट येथे आले आणि बॅगची ओळख करून बॅगेत असलेल्या वस्तू — रोख ₹20,000/-, सॅमसंग टॅब किंमत ₹15,000/- व इतर वस्तू, एकूण ₹40,000/- यांची अचूक माहिती दिली. सत्यापन केल्यानंतर, बॅग प्रवाशास सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आली.

प्रवाशाने, व खान्देश प्रवासी असोसिएशन,धरणगाव यांनी अमळनेरच्या RPF अधिकारी व सर्व टीम यांचा कार्यपद्धतीचे कौतुक करून आपला आभार व्यक्त केले.


Post a Comment

Previous Post Next Post