धरणगाव (ता.११ मे) – भारतीय सेनेला पाठिंबा व केंद्र सरकारच्या कामगिरीचे अभिनंदन करण्याच्या उद्देशाने उद्या दिनांक ११ मे रोजी धरणगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, त्या अनुषंगाने जळगाव ग्रामीण शिवसेनेतर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सर्व राष्ट्रप्रेमी व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. सरीताताई कोल्हे, युवासेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, रवी कापडणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, दीपक भदाणे, संघटक प्रमुख रवींद्र चव्हाण सर, तसेच जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील, मुकुंदराव ननवरे व शहर प्रमुख विलास महाजन यांनी केले आहे.
रॅलीचे ठिकाण व वेळ :
स्थळ: बालाजी मंदिर, धरणगाव
वेळ: सकाळी ९ वाजता (टीप : रॅली वेळेवर निघेल)
Post a Comment