धरणगाव – परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 20 मे 2025 रोजी, मंगळवार संध्याकाळी 5 वाजता मातृतीर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे भव्य राष्ट्रीय महा सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संगाच्या अनुषंगाने गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे यांचा खान्देश दौरा अत्यंत यशस्वी ठरला.
सिंदखेड राजा हे ऐतिहासिक ठिकाण राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळामुळे प्रसिद्ध आहे. याच पवित्र भूमीतून स्वराज्याची संकल्पना मूर्त स्वरूपात प्रकट झाली होती. सत्संग प्रसंगी आदरणीय आबासाहेबांनी जिल्हा, तालुका व शहरातील प्रतिनिधी आणि सेवेकऱ्यांशी संवाद साधत केंद्रातील 18 विभागांविषयी मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनात गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, सेंद्रिय शेती, स्वयंरोजगार विभाग तसेच सेवा कार्याचे महत्व विशद करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मंत्र जपाच्या सकारात्मक परिणामांविषयी आणि सेवेकऱ्यांच्या अनुभवांची माहितीही त्यांनी दिली.
सिंदखेड राजा केंद्रासाठी उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा खासदार निधीतून करण्यात आला. या सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आयकर उपायुक्त विशाल मकवाने, आणि शिवसेना शहरप्रमुख विलास महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. महाजन यांनी या केंद्रासाठी आमदार निधीतून सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आबासाहेब मोरे यांचा सत्कार आयकर विभागाचे अप्पर उपआयुक्त विशाल मकवाने यांनी श्रीफळ, पेढे व वृक्ष देऊन केला. त्यानंतर सेवेकरी प्रशांत फुलपगार यांनी मकवाने यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा प्रतिनिधी बोरसे सर, तर सूत्रसंचालन कुणाल ठाकरे यांनी केले. तालुक्यातील साप्ताहिक केंद्रातील सेवेकरी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने झालेल्या या सोहळ्यात विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व सेवेकरी परिवाराने अपार मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचे वाटप करून समारोप करण्यात आला.
भाविक व सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment