Top News

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधीCBSE 10 वी निकाल 2025

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी या शाळेने CBSE इयत्ता 10 वीच्या परीक्षेत यंदाही 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले असून, विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उत्तुंग यश संपादन केले आहे.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे:
सानिका महाजन – 91%
राजश्री तांदळे – 90%
श्रुती इसाने – 90%

यात राजश्री तांदळे या विद्यार्थिनीने मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.

शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत यशस्वी कामगिरी केली आहे.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी, प्राचार्य विवेक रुपनर व संचालक जी. डी. पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post