प्रथम क्रमांक (९२.२०/.)
साळवे इंग्रजी विद्यालय साळवे
धरणगाव तालुक्यातील साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे येथील विद्यार्थ्यांनी मार्च 2025 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल कामगिरी करत शाळेच्या यशात भर घातली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 94.44% लागला असून, कु. सना निसार पटेल हिने 92.20% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
द्वितीय क्रमांक (92.20% )
साळवे इंग्रजी विद्यालय साळवे
दुसऱ्या क्रमांकावर कृ प्रणाली राजेंद्र नारखेडे हिने 90.20%, तिसऱ्या क्रमांकावर निखिल ज्ञानेश्वर पाटील (उखळवाडी) (86%), चौथ्या क्रमांकावर तृप्ती भरत पाटील (उखळवाडी) (85.60%) आणि पाचव्या स्थानावर गितेश प्रमोद पाटील (कामतवाडी) (85.20%) गुण मिळवून यांनी घवघवीत यश मिळवत शाळेचा गौरव वाढविला आहे.
यंदा एकूण 54 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी 90% च्या वरती गुण, 11 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण, व 17 विद्यार्थ्यांनी 70% चे वर गुण मिळवले आहेत. हा निकाल विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचा आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचा उत्कृष्ट नमुना आहे.
या गौरवपूर्ण निकालाबद्दल शाळेचे संचालक मंडळ अध्यक्ष डॉक्टर गिरीश नारखेडे, सचिव श्री रमेश बोरोले, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे व शालेय समितीचे चेअरमन डॉ. शशिकांत नारखेडे तसेच इतर संचालक मंडळीनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. मुख्याध्यापक श्री सुधाकर दामोदर मोरे आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री जी व्ही नारखेडे, व्ही के मोरे, ए वाय शिंगाने, एस पी तायडे, व्ही एस कायंदे, सौ आर. पी. नेहेते, नीता पाटील, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके, गुणवंती पाटील मॅडम तसेच इतर शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोलाचे ठरले.
या यशस्वी निकालामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी होवो, हीच सर्वांची अपेक्षा आणि शुभेच्छा.
Post a Comment