Top News

धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वीरित्या संपन्न.

धरणगाव (प्रतिनिधी) – तालुका विधी सेवा समिती आणि धरणगाव तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० मे २०२५ रोजी (शनिवार) धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत एकूण ३१ न्यायालयीन प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, विविध बँका व पतसंस्थांच्या मिळकतीतून सुमारे दहा लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

लोक अदालतीत पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश श्री. ए. ए. ढोके साहेब यांनी काम पाहिले तर पॅनल पंच म्हणून अँड. रविंद्र गजरे यांनी जबाबदारी पार पाडली. या यशस्वी आयोजनासाठी धरणगाव वकील संघाचे अध्यक्ष अँड. महेंद्र चौधरी, उपाध्यक्ष अँड. संजय महाजन, सचिव अँड. गणेश मांडगे, सहसचिव अँड. प्रदीप पाटील यांच्यासह संघाचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये अँड. सी. झेड. कटयारे, अँड. राहुल पारेख, अँड. मनोज दवे, अँड. मोहन शुक्ला, अँड. संदीप सुतारे, अँड. बी. के. आवारे, अँड. आर. एस. पाटील, अँड. गजानन पाटील, अँड. व्ही. एस. भोलाने, अँड. हर्षल चव्हाण, अँड. गौरव जाजू, अँड. आर. एस. शिंदे, अँड. संजय शुक्ला, अँड. राजेंद्र येवले, अँड. आसिफ काद्री, अँड. शरद माळी, अँड. अजय बडगुजर, अँड. कैलास मराठे, अँड. प्रशांत क्षत्रिय, अँड. कूलदीप चंदेल, अँड. संदीप पाटील, अँड. डी. ए. माळी, अँड. ऋषभ शुक्ला, अँड. गिरीष कटयारे, अँड. रविराज परिहार, अँड. विक्रम परिहार, अँड. त्रिवेदी, अँड. अक्षय दवे, अँड. एकनाथ पाटील, अँड. सागर महाजन, अँड. रावसाहेब निकुंभ, अँड. सागर वाजपेयी, अँड. विजय पाटील, अँड. मोरे, अँड. पुरभे, अँड. बडगुजर, अँड. मंगेश लोहार, अँड. दिलीप चव्हाण, अँड. शुभम शुक्ला, अँड. सिद्दी चौधरी, अँड. रायपूरकर, अँड. योगेश गजरे आणि अँड. गजरे मॅडम यांसह अनेक सिनिअर व ज्युनिअर वकील उपस्थित होते.

या यशस्वी आयोजनासाठी कार्यालय अधीक्षक साहेब व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लोक अदालतीद्वारे जलद न्यायदानाचे उत्तम उदाहरण धरणगाव न्यायालयाने पुन्हा एकदा साकारले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post