धरणगाव (जि. जळगाव) – हनुमान जन्मोत्सवानिमित्त चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने 18 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात भव्य खुल्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील आणि पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तालुक्यातील विविध मान्यवर, पत्रकार, न्युज चॅनल प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रमुख मल्लांमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील, भारत केसरी शमशाद शेख, उत्तर प्रदेश चॅम्पियन वसीम खान, महाराष्ट्र चॅम्पियन विजय सुराळे, हरियाणा केसरी राहील शेख, महाराष्ट्र चॅम्पियन महेश फुलमाळी, हरियाणा केसरी मोहित यादव, नाशिक चॅम्पियन सैफअली पंजाबी, मध्यप्रदेश केसरी समरोज लाला, जिल्हा चॅम्पियन अजिंक्य माळी, जिल्हा चॅम्पियन दामू वाकोडे, बुरहानपूर चॅम्पियन समीर शेख, धरणगावचे निलेश महाजन आणि चाळीसगावचे संदीप पाटील यांचा समावेश आहे.
चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी धरणगाव तालुक्यातील सर्व कुस्तीप्रेमींना या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment