पाळधी (ता. धरणगाव) | दि. 12 एप्रिल 2025 – इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे आज बुद्धी व शक्तीचे प्रतीक असलेल्या वीर बजरंगबलीची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सश्रद्ध हनुमान चालीसा पठणाने झाली. यामुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालेला होता.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रायमरी विभागातील विद्यार्थी – जे हनुमानाच्या वेषात सजून आले होते. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या वेळी शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी, संचालक विजय चौधरी, जी. डी. पाटील, प्राचार्य श्री. विवेक रुपनर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जय श्रीराम! जय हनुमान!” या गगनभेदी घोषणांनी शाळेचे वातावरण दुमदुमून गेले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण शाळा परिवाराचे विशेष सहकार्य लाभाले.
Post a Comment