धरणगाव | दि. 11 एप्रिल 2025 – क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेच्या वतीने “क्रांतिकारी खाज्याजी नाईक बलिदान स्मरण दिन व क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती” निमित्ताने पूजन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुषप्रसाद साहेब यांनी क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीस्थळाला भेट देत सद्यस्थितीत सुरू असलेल्या स्मारक बांधकामाचा आढावा घेतला. त्यांनी स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
स्मृतीस्थळी भेट देऊन त्यांनी खाज्याजी नाईक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, उपाध्यक्ष यशवंत कुवर, सचिव विलास महाजन, संचालक संजय सोनवणे, शिवा भील, समाधान मोरे, व्यवस्थापक अमोल जाधव, रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह मोहन हिरालाल चौधरी, डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व जनजाती समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनीही स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यांना बलिदान स्मरण दिनाचे व महात्मा फुले यांच्या कार्याचे महत्त्व सांगण्यात आले. नंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव विलास महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment