उखळवाडी तालुका धरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुनील शिसोदे यांनी राज्यस्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी कला सादर केल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोहळयामध्ये देण्यात आले.
अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंडळ, श्री क्षेत्र माहूरगड जिल्हा नांदेड यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षकांच्या स्पर्धेमध्ये राज्यभरातून विविध शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला होता. त्यात उखळवाडी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री सुनील शिसोदे यांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गायन कला सादर केली व महाअंतिन स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष नटराज मोरे, विभागीय अध्यक्ष नरेश मुनेश्वर व मराठवाडा विभागीय सचिव शेषराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. त्याबद्दल त्यांचे गटशिक्षण अधिकारी डॉक्टर भावना भोसले मॅडम, केंद्रप्रमुख दिनेश चौधरी, सहकारी शिक्षक दिगंबर नारखेडे, विषय तज्ञ शिक्षक, गटसाधन केंद्र व पंचायत समिती धरणगाव यांच्यातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
Post a Comment