Top News

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे धरणगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

धरणगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या सौजन्याने व पद्मश्री भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छता ही सेवा” या संकल्पनेनुसार धरणगाव तालुक्यात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत हे अभियान हाती घेण्यात आले. या उपक्रमात श्रीबैठक धरणगाव, पिंप्री, बिलखेडा, पाळधी, सोनवद येथील एकूण १८८ श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्वच्छता मोहिमेत एकूण २ टन १७५ किलो ओला व कोरडा कचरा संकलित करण्यात आला. उद्घाटन सोहळा व मान्यवरांची उपस्थिती या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपा गटनेते कैलास माळी, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि श्री सदस्यांचे स्थानिक स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. स्वच्छता हीच सेवा या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत भविष्यातही असे अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post