धरणगाव – येथील हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे रहिवासी, ओम शांती केंद्राचे सेवक, सेवानिवृत्त बस वाहतूक नियंत्रक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद नामदेव चौधरी यांची मा. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालयाच्या निमंत्रक सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वाचनालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष पी. एम. पाटील, उपाध्यक्ष चंदन दिलीपराव पाटील, सचिव योगेश प्रकाश पाटील, अनंत जाधव व संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
प्रल्हाद चौधरी हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, त्यांच्या अनुभवाचा वाचनालयाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Post a Comment