Top News

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के. पाटील निलंबित.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांना मारहाणी चे प्रकरण.


शिरपूर: श्री शिव प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.के. पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

निरीक्षक पाटील यांच्यावर एका बेकायदेशीर गुन्ह्याचा आरोप असून, या घटनेची चौकशी पोलीस उपअधीक्षक करणार आहेत. निरीक्षक पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी शिरपूर शहरात शनिवारी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शिरपूरमध्ये नक्की काय घडले?

सूत्रांच्या माहितीनुसार, श्री शिव प्रतिष्ठानचे तालुका प्रमुख जयेश पाटील आणि अन्य पदाधिकारी एका प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी, निरीक्षक के.के. पाटील यांनी या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू

शिरपूर शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशी धुळे शहर विभागाचे एसडीपीओ राजकुमार उपसे करणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, साक्रीचे पोलीस उपअधीक्षक संजय वाबळे यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा तात्पुरता कार्यभार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post