धरणगाव (प्रतिनिधी) – येथील समस्त लहान माळीवाडा पंच मंडळाच्या वतीने समाज भवनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
सकाळी समाज भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात धरणगाव नगरपालिकेचे गटनेते व नगरसेवक पप्पु भावे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून जयघोष करण्यात आला.
या प्रसंगी आपल्या मनोगतात पप्पु भावे यांनी संत आणि महात्म्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिलेल्या महिलाशिक्षणाच्या वारशाची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख विलास महाजन, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, खजिनदार राजेंद्र महाजन, दीपक महाजन, राजू महाजन, धिरज महाजन, गोरख महाजन, एस.डब्ल्यू. पाटील, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह शिपाई गणेश निकम आणि पंच मंडळ उपस्थित होते.
Post a Comment