Top News

शिरसोली प्र. बो. येथे जागतिक महिला दिनी शिवसेना व युवासेना महिला शाखेचे उद्घाटन.



शिरसोली प्र. बो. (ता. जळगाव) येथे जागतिक महिला दिनाच्या शुभ मुहूर्तावर शिवसेना आणि युवासेना महिला शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांच्या सबलीकरणावर भर देत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. "महिला सशक्त झाल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे. सर्व भगिनींनी निर्भयपणे आपल्या अडचणी मांडाव्यात," असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनावणे, धोंडू जगताप, शिवसेना संपर्क प्रमुख श्यामभाऊ कोगटा, माजी पंचायत समिती सभापती नंदुभाऊ पाटील, युवासेना तालुका प्रमुख रामकृष्ण काटोले, शिवदास बारी, प्रवीण बारी, प्रशांत काटोले, नितीन बुंधे यांसह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवासेना अध्यक्षा रुपाली ताडे, अर्चना ताडे, प्रीती खलसे आणि ७५ महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले. या उद्घाटन सोहळ्यामुळे गावातील महिलांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post