पिंप्री खुर्द: पिंप्री खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सरलाबाई रामचंद्र लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच मंगल नामदेव पाटील यांनी नियमानुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि. १०) दुपारी २ वाजता सरपंच कमलबाई गोकुळ धोबी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी उपसरपंच पदासाठी सौ. सरलाबाई लोखंडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांचे सूचक म्हणून ज्ञानेश्वर बाबुलाल बडगुजर यांनी स्वाक्षरी केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी सुनिल बोरसे, माजी सरपंच सरलाताई ज्ञानेश्वर बडगुजर, तसेच सदस्य धनराज मनुरे, सुनील बडगुजर, शांताराम मोरे, रुक्साना खाटीक, अनुसायाबाई सोनवणे, छायाबाई बडगुजर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
नवनियुक्त उपसरपंच सौ. सरलाबाई लोखंडे यांना राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच माजी जि. प. सदस्य गोपाल चौधरी, अनिल शिवनारायण पाटील, मधुकर रामदास बडगुजर, देविदास चौधरी, प्रवीण वसईकर गुरुजी, बाळू मोरे सर, आबा धोबी, राजू बिजबिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
पिंप्री खुर्द परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Post a Comment