जळगाव -धरणगाव मार्गे नवसारी बस सुरू..
खान्देश प्रवासी असोसिएशन,व धरणगाव वासियांकडून कडून ना. श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे खूप खूप आभार
तसेच जळगाव धरणगाव मार्गे "सिल्वासा" बस सुरू करण्यासंदर्भात ना. श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचा सकारात्मक प्रतिसाद...
मा.पालकमंत्री ना.श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांना खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांचे कडून
जळगाव ते सिल्वासा व जळगाव ते नवसारी या बसेसला धरणगाव मार्गे सुरु करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले होते.
त्यापैकी जळगाव- धरणगाव- अमळनेर -धुळे- साक्री -नवसारी ही गाडी सुरू करण्यात आली असून ही गाडी दररोज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान धरणगाव येथून असेल तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खान्देश प्रवासी असोसिएशन यांचेकडून करणे करण्यात आलेले आहे.
आज जळगाव- धरणगाव -अमळनेर - धुळे साक्री मार्गे नवसारी या गाडीचे वाहक व चालक व धरणगाव बस स्टँड व्यवस्थापक यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जी महाजन गटनेते कैलास माळी सर, शिवसेनेचे नेते मा. नगरसेवक विजय भाऊ महाजन, शहराध्यक्ष दिलीप भाऊ महाजन, डॉ हेडगेवार नगर ग्रामपंचायत उपसरपंच चंदन दादा पाटील, ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष- मधुकरजी महाजन,जेष्ठ रतिलाल नाना चौधरी,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल भाऊ महाजन, आ.श्री माधवरावजी पाटील साहेब श्री. बिपीनभाऊ अमृतकर, श्री.पियुषभाऊ बागड,तसेच शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व खान्देश प्रवासी असोसिएशनचे,अध्यक्ष श्री कमलेशदादा तिवारी, उपाध्यक्ष -चंद्रकांत भावसार,सचिव श्री श्रेयांस जैन,सहसचिव ऍड नंदन पाटील, खजिनदार -प्रतीक जैन सदस्य- श्री नारायणजी महाजन,श्री प्रशांतजी भाटिया, श्री दिनेश भाऊ पाटील, श्री कन्हैया भाऊ रायपुरकर, श्री संभाजी सोनवणे, व श्री जतिनजी नगारीया उपस्थित होते.
Post a Comment